आरोग्यमहाराष्ट्रसातारा

नवतेजस्विनी महोत्सवात 205 महिलांची आरोग्य तपासणी

B1न्यूज मराठी नेटवर्क


सातारा : महिला आर्थिक विकास महामंडळ व सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक विद्यमाने जिल्हा परिषद मैदान येथे नवतेजस्विनी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात रोटरी क्लब ऑफ सातारा सेवन हिल्स यांच्यातर्फे 205 महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

यामध्ये दंत चिकित्सा, हिमोग्लोबिन व मधुमेह तपासणी करण्यात आली.सोबतच रुग्णांना मोफत औषधे देण्यात आली. आरोग्य तपासणी शिबिरामध्ये श्वास मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, अग्रवाल डेंटल अँड ऑर्थोडाँटिक क्लिनिक , संजीवन नर्सिंग कॉलेज, कृपांकित मेडिकल सातारा यांच्या टीमने विशेष योगदान दिले.

आरोग्य शिबिराच्या उदघाटन प्रसंगी रोटरीयन हरीश भोसले यांनी भविष्यात ग्रामीण भागात असे शिबीर घेणार असल्याचे सांगितले. आरोग्य शिबीर यशस्वी होण्यासाठी प्रोजेक्ट चेअरमन रो.हरीश भोसले, रो. डॉ विक्रांत देशमुख, रो.डॉ आकाश अग्रवाल, रो. उमेद गांधी यांची महत्त्वपूर्ण मदत झाली. आरोग्य शिबीर नियोजनासाठी जिल्हा समन्वय अधिकारी विजय डोके व माविम टीम ,सी एम आर सी स्टाफ यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button