आरोग्यबार्शी

बार्शी शहर व ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने क्षयरोग शोध मोहीम

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : तालुक्यात 8 मार्च ते 21 मार्च या कालावधीमध्ये अतिजोखीमग्रस्त भागात क्षयरोग शोध मोहीम राबविण्यात येणार असून आशा स्वयंसेविका यांच्या माध्यामातून लक्षणांची तपासणी केली जाणार असून मोफत औषधोपचार केले जातील. ङॉ.मीनाक्षी बनसोडे जिल्हा क्षयरोग अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानाचे नियोजन करण्यात आले तसेच सक्रिय क्षयरोग शोध मोहीम या दरम्यान समाजातील निदान न झालेल्या क्षतिग्रस्त रुग्णाचा प्रत्यक्ष गृहभेटीद्वारे शोध घेऊन उपचाराखाली आणणे हा या मोहिमेचा हेतू असून सदरील मोहीम यशस्वी करण्यासाठी बार्शी शहर व ग्रामीण भागातील आरोग्य पथकांना जनतेने सहकार्य करावे व मोहीम यशस्वी करावी असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी थोरात, वैद्यकिय अधीक्षक डॉ. सचिन कदम, वैद्यकीय अधिकारी डॉ. शीतल बोपलकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. रविंद्र माळी यांनी तालुक्यातील नागरिकांना आव्हान केले.या मोहीम कालावधीत आरोग्य कर्मचारी एकूण 7360 घरांना भेटी देणार असून 37000 लोकसंख्या तपासणार आहेत त्यासाठी एकूण 34 टीम यामधे काम करणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button