कोल्हापूरजयंतीमहाराष्ट्र

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या कडून पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन

B1न्यूज मराठी नेटवर्क

कोल्हापूर : भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बिंदू चौक येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील सर्वांना जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या.

यावेळी पालकमंत्री आबिटकर म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना जगण्याचा, स्वातंत्र्याचा मूलमंत्र दिला. त्याचबरोबर आपल्या सर्वांचा स्वाभिमान जागृत केला. आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचे स्मरण करताना त्यांच्या विचारांचा,आचारांचा त्यांच्या कर्तृत्वाच्या माध्यमातून देशभरामध्ये त्यांच्या नावाच्या जयजयकारामधून नवीन पिढीने प्रेरणा घेऊन काम करण्याचा संकल्प करायला हवा. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी परिवर्तनाच्या लढाईमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबरोबर खूप चांगले काम केले आहे, असे सांगून त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल सर्व भीमसैनिकांचे अभिनंदन केले. त्याचबरोबर उपस्थित सर्व नागरिकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button