राज्याचा अर्थसंकल्प आता मुख्यमंत्री फडणवीस मांडणार; ‘अजितदादांनी पूर्ण तयारी केली होती’ — देवेंद्र फडणवीस

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

मुंबई : महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मांडण्यासाठी संपूर्ण तयारी केली होती. मात्र त्यांच्या दुःखद निधनामुळे अर्थमंत्री पद रिक्त झाले असून, उर्वरित अर्थसंकल्पीय प्रक्रिया पूर्ण करून तो सभागृहात मांडण्याची जबाबदारी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः स्वीकारली आहे.

“अजितदादांनी अर्थसंकल्पाची संपूर्ण तयारी करून ठेवली होती. उर्वरित काम पूर्ण करून राज्याचा अर्थसंकल्प मांडण्याची जबाबदारी माझी आहे,” अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

शुक्रवारी पार पडलेल्या महत्त्वाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख नेते सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित होते. बैठकीत उपमुख्यमंत्री पद, अजित पवार यांच्याकडे असलेली खाती तसेच आगामी अर्थसंकल्पाबाबत सखोल चर्चा करण्यात आली.

राज्याचा अर्थसंकल्प हा अत्यंत महत्त्वाचा विषय असल्याने तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आगामी अधिवेशनात अर्थसंकल्प मुख्यमंत्री फडणवीस हेच सभागृहात सादर करणार आहेत. उद्यापासून अर्थसंकल्पीय कामकाजाला औपचारिक सुरुवात होणार असल्याचेही सांगण्यात आले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या