बार्शीसामाजिक

बार्शीच्या जीवनज्याेत या सामाजिक संघटनेचे संस्थापक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अजित कुंकुलाेळ यांचा रविवारी (ता १४) ठाणे येथे  काेव्हीड याेध्दा म्हणुन गाैरव

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : काेराेना महामारीच्या काळात जीवाची पर्वा न करता  केलेल्या रुग्ण सेवेबद्दल अर्थात काेराेना महामारीच्या युध्दात अग्रभागी राहिल्याने बार्शीच्या जीवनज्याेत या सामाजिक संघटनेचे संस्थापक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अजित कुंकुलाेळ यांचा रविवारी (ता १४) ठाणे येथे  काेव्हीड याेध्दा म्हणुन गाैरव करण्यात येणार आहे.वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष’ आणि खासदार  ‘डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन‘ यांच्या सयुंक्त विद्यमाने ४ थ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत रविवारी (ता १४)  दुपारी ३ वाजता ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, मानपाडा, ठाणे (पश्चिम) येथे एका दिमाखदार कार्यक्रमात अजित कुंकुलाेळ यांना ‘कोविड योद्धा सन्मान’ प्रदान करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त ज्या रुग्णालयांनी या कोविड संकट काळात कोरोना बाधितांना अविरत – अविश्रांत सेवा दिली अशा महाराष्ट्रातील निवडक ५० रुग्णालयांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.  महाराष्ट्र राज्याचे  पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री अदिती तटकरे, राज्यमंत्री  बच्चू  कडू, वरुण सरदेसाई, पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने, पत्रकार राजीव खांडेकर,  महाराष्ट्र  डिजीटल मिडिया संपादक, पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष  राजा माने, चित्रपट अभिनेते मंगेश देसाई आदी मान्यवरांच्या हस्ते ‘कोविड योद्धा सन्मान’ हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.कुंकुलाेळ यांनी काेराेना महामारीच्या काळात साेलापुर जिल्ह्यातील पहिले कम्युनिटी किचन सुरू करत ते यशस्वीपणे सांभाळत गरजुंना व काेराेना रुग्णांना दाेन वेळचे दर्जेदार जेवन दिले तसेच सँनिटायझर व  मास्क चे माेफत वाटप केले रस्त्यावर उतरुन काेराेना रुग्णांना वैद्यकीय सुविधा मिळवुन देण्याचा प्रयत्न केला रक्तपेढी आपल्यादारी हा अनाेखा उपक्रम राबवत काेराेना काळातील रक्ताची गरज भागवली काेराेना रूग्णांसाठी प्लाझ्मा थेरेपीसाठी रक्तपेढीच्या माध्यमातुन माफक दरात प्लाम्झा उपलब्याध करून दिला या सर्व सामाजिक कामाची  दखल घेत कुंकुलाेळ यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

बार्शी ता ११ काेराेना महामारीच्या काळात जीवाची पर्वा न करता  केलेल्या रुग्ण सेवेबद्दल अर्थात काेराेना महामारीच्या युध्दात अग्रभागी राहिल्याने बार्शीच्या जीवनज्याेत या सामाजिक संघटनेचे संस्थापक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अजित कुंकुलाेळ यांचा रविवारी (ता १४) ठाणे येथे  काेव्हीड याेध्दा म्हणुन गाैरव करण्यात येणार आहे.

वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष’ आणि खासदार  ‘डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन‘ यांच्या सयुंक्त विद्यमाने ४ थ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत रविवारी (ता १४)  दुपारी ३ वाजता ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, मानपाडा, ठाणे (पश्चिम) येथे एका दिमाखदार कार्यक्रमात अजित कुंकुलाेळ यांना ‘कोविड योद्धा सन्मान’ प्रदान करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त ज्या रुग्णालयांनी या कोविड संकट काळात कोरोना बाधितांना अविरत – अविश्रांत सेवा दिली अशा महाराष्ट्रातील निवडक ५० रुग्णालयांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्याचे  पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री अदिती तटकरे, राज्यमंत्री  बच्चू  कडू, वरुण सरदेसाई, पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने, पत्रकार राजीव खांडेकर,  महाराष्ट्र  डिजीटल मिडिया संपादक, पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष  राजा माने, चित्रपट अभिनेते मंगेश देसाई आदी मान्यवरांच्या हस्ते ‘कोविड योद्धा सन्मान’ हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. कुंकुलाेळ यांनी काेराेना महामारीच्या काळात साेलापुर जिल्ह्यातील पहिले कम्युनिटी किचन सुरू करत ते यशस्वीपणे सांभाळत गरजुंना व काेराेना रुग्णांना दाेन वेळचे दर्जेदार जेवन दिले तसेच सँनिटायझर व  मास्क चे माेफत वाटप केले रस्त्यावर उतरुन काेराेना रुग्णांना वैद्यकीय सुविधा मिळवुन देण्याचा प्रयत्न केला रक्तपेढी आपल्यादारी हा अनाेखा उपक्रम राबवत काेराेना काळातील रक्ताची गरज भागवली काेराेना रूग्णांसाठी प्लाझ्मा थेरेपीसाठी रक्तपेढीच्या माध्यमातुन माफक दरात प्लाम्झा उपलब्याध करून दिला या सर्व सामाजिक कामाची  दखल घेत कुंकुलाेळ यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button