बार्शीत जागतिक महिला दिनानिमित्त ‘महिला आरोग्य मार्गदर्शन शिबिरा’चे आयोजन

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राधाकृष्ण इंटरनॅशनल ट्रेडर्स संचलित ‘सिकसेम थेरपी सेंटर’ बार्शी यांच्या वतीने भव्य ‘महिला आरोग्य मार्गदर्शन शिबिरा’चे आयोजन करण्यात आले आहे. महिलांच्या आरोग्याप्रती जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे तपशील:
दिनांक व वेळ: बुधवार, १८ मार्च २०२६, सकाळी १०:३० वाजता.
स्थळ: शिवाजी नगर, शिवशक्ती बँकेच्या शेजारी, बार्शी.
प्रमुख उपस्थिती:
या कार्यक्रमाचे अध्यक्षपद बार्शी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. तेजस्विनीताई प्रशांत कथले भूषवणार आहेत.
प्रमुख पाहुणे म्हणून:
रोहित रमेश पाटील (उपनगराध्यक्ष, बार्शी नगरपरिषद)
भारत पवार सर (सभापती, शिक्षण विभाग बा.न.प.)
सौ. कांचन नितीन मोहिते (नगरसेविका, बार्शी नगरपरिषद) यांची उपस्थिती लाभणार आहे.
तसेच, या प्रसंगी संदिप अलाट, धिरज शेळके, सौ. शितल मांजरे, डॉ. नितीन भराटे, प्रा. सुभाष जगदाळे सर आणि प्रा. दामोदर कुलकर्णी आदी मान्यवर प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
आयोजक:
या शिबिराचे आयोजन अधिकृत सेंटर सिकसेमचे संचालक गोविंद सर आणि संजना मॅडम यांनी केले आहे. महिलांच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त महिलांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी महिलांनी ९४०३०८७३९१ किंवा ९६५७०८७३९१ या क्रमांकावर संपर्क साधावा.




