बार्शी शहर पोलीस ठाणे येथील बेवारस मुद्देमालाचा लिलाव झाला जाहीर
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : शहर पोलीस ठाणे येथे मागील काही वर्षापासून २८ वाहने बेवारस वाहने पडून होती. त्याचा कायदेशीर लिलाव प्रक्रिया पुर्ण करून मा. तहसीलदार बार्शी यांची परवानगी घेण्यात आली होती. त्यासाठी बार्शी शहर पोलीस ठाणेकडून वेळोवेळी प्रसिध्दी देण्यात आली होती. अनुषंगाने दि. २०/०१/२०२५ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर, पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे तसेच दोन पंचासमक्ष जाहीर लिलाव ठेवण्यात आला होता. लिलावासाठी व त्यांनतर देखील काही अटी व शर्ती ठेवण्यात आल्या होत्या.
बेवारस वाहनाच्या लिलावासाठी विविध शहरातील एकूण २४ व्यावसायिकांनी सहभाग घेतला होता. लिलावाची सुरूवात १,१५,०००/- रू पासून सुरू होऊन १,३८,०००/- रू ला संपली. सदरचा लिलाव वसिम स्क्रॅप मर्चटंचे मालक वसिम युसुफ शेख रा. तेलगाव नाका, बीड यांनी घेतला. इतर व्यावसायिक व पोलीस अधिकारी यांनी वसिम शेख यांचे अभिनंदन केले. सदरची रक्कम शासन जमा करण्यात येणार आहे.
बेवारस वाहनांचा लिलावासाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. तसेच बार्शी शहर पोलीस ठाणेकडील बार्शी शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, पोसई महेश गळगटे, पोहेकॉ सचिन कदम, पोहेकॉ विलास आडसूळ तसेच इतर स्टाफ यांनी मेहनत घेतली.




