प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, बार्शी सेवाकेंद्राच्या ईश्वरीय सेवेच्या ५० वर्षांचा सुवर्णमहोत्सव…

0

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, बार्शी सेवाकेंद्राच्या ईश्वरीय सेवेच्या ५० वर्षांचा सुवर्णमहोत्सव १८ जानेवारी १९६९ रोजी साकार संस्थापक प्रजापिता ब्रह्माबाबा संपूर्ण अवस्थेला पोहोचून अव्यक्त झाले. ब्रहमाबाबांच्या ७ व्या स्मृतीदिनी बार्शी येथे ईश्वरीय सेवेचे बीजारोपण झाले. आज, दिनांक १८ जानेवारी २०२६, रोजी बार्शीतील ईश्वरीय सेवेला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. आज मी ब्रह्माकुमारीज मुख्यालय, शांतीवन, आबू रोड येथे ब्रह्माबाबांच्या ५७ व्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झालो आहे.

अमृतवेळेच्या योगसाधनेत व बाबांना भोग-प्रसाद अर्पण करण्याच्या प्रत्येक क्षणी, स्वतःच्या आध्यात्मिक साधनेत (स्व-पुरुषार्थात) अधिक तीव्र गती आणण्याचा संकल्प मनात वारंवार उदयास येत होता. त्याचबरोबर ईश्वरीय सेवेचा एक विशेष संकल्पही दृढ होत गेला. बार्शी येथे ब्रह्माकुमारीजचे नवनिर्मित ईश्वरीय सेवा भवन आता पूर्णतः तयार झाले आहे.

या भवनामध्ये—सुमारे १७५ जणांच्या क्षमतेचे सुसज्ज सभागृह तसेच २५ जणांच्या क्षमतेचा बाबांचा कक्ष (योगकक्ष) अशी उत्तम व्यवस्था उपलब्ध आहे. या सुविधांचा बार्शीकरांनी मोठ्या प्रमाणावर लाभ व्हावा , अशी तीव्र इच्छा बाबांच्या स्मृतीदिनी वारंवार झाली.

त्यासाठी नवीन वर्ष २०२६ मध्ये विविध क्षेत्रांत, विविध संघटनांत कार्यरत असलेल्या बंधू-भगिनींसाठी एकूण ५० स्नेहमिलन कार्यक्रम सेवाकेंद्राच्या सभागृहात, सेवाकेंद्र संचालिका आदरणीय राजयोगिनी संगीतादिदी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येतील.

या स्नेहमिलन कार्यक्रमांमध्ये—गाईडेड मेडिटेशनद्वारे शांतीची अनुभूती तणावमुक्ती नातेसंबंधांमध्ये मधुरता समाधानी व संतुलित जीवन या विषयांवर मार्गदर्शन, तसेच अनुभवी साधकांचे अनुभवकथन ठेवले जाईल. आजच्या धावपळीच्या व तणावपूर्ण जीवनात हा उपक्रम निश्चितच अत्यंत उपयुक्त ठरेल, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.

दिनांक १० जानेवारी रोजी बार्शीतील पत्रकार बंधू-भगिनींचे स्नेहमिलन ब्रह्माकुमारीज सेवाकेंद्रात आयोजित करण्यात आले होते. या स्नेहमिलनाचा ३० ते ३५ पत्रकार बंधू-भगिनींनी लाभ घेतला असून त्याचा वृत्तांत त्यांच्या दैनिक, साप्ताहिक व वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलेलाच आहे. मी स्वतः तसेच बार्शी निवासी ब्रह्माकुमारीज परिवार, सेवाकेंद्र संचालिका आदरणीय संगीतादिदी यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच आपल्याशी संपर्क साधू. तथापि, त्याआधी आपल्या संघटनेतील सदस्यांसह, व्यावसायिक व कार्यालयीन सहकाऱ्यांसह या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी आपल्या सोयीचा दिवस व वेळ कळवून कृपया संपर्क साधावा. हा उपक्रम पूर्णतः नि:शुल्क आहे.

ईश्वरीय सेवेत, ब्रह्माकुमार मोहनभाई केअरटेकर, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय,
बार्शी सेवाकेंद्र मोबाईल क्रमांक : 8767507287 , 912483510
5000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या