पत्रकार विषयकबार्शी

व्हॉईस ऑफ मीडिया यांच्या वतीने बार्शीतील ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान, व सदस्यांना विमा कवच व आरोग्य तपासणी

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : समाजाची आवड आणि माध्यमांचे स्वरुपही बदलत आहे, त्यानुसार आपण नव्या बदलत्या प्रवाहाचा स्विकार करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार एन. आर. कुलकर्णी यांनी केले. येथील व्हॉईस ऑफ मीडिया शहर आणि तालुका शाखेच्या वतीने तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकारांना शाल, डायरी, पेन, माला, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. सावळे आण्णा सभागृह येथे शनिवारी दि.६ रोजी हा कार्यक्रम पार पडला याप्रसंगी ते बोलत होते.


कुलकर्णी म्हणाले, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांतील प्रगतीमुळे समाजात मांडले जाणारे चित्र आशादायी आहे. ते चित्र जगाशी जोडणारे, वेगाने प्रगतीकडे नेणारे असल्याने सांगत त्याचे स्वागत करुन आत नव्याचा स्विकार करण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. समाजाच्या प्रगतीसाठी झगडणाऱ्या पत्रकारांनी मोठ्या बदलांसह सज्ज रहावे असे आवाहन केले. याप्रसंगी त्यांनी आजपर्यंतच्या पत्रकारितेचा प्रवासही वर्णन केला.
अजित कुंकूलोळ यांनी व्हॉईस ऑफ मिडीया संघटनेचे पत्रकारांसाठी देश आणि परदेशातही सुरु असलेले कार्य सांगून भविष्यातील उपक्रमांविषयी माहिती दिली. उपस्थित मान्यवर व पुरस्कारप्राप्त ज्येष्ठांनीही मनोगते व्यक्त केली.


यावेळी अध्यक्षस्थानी उद्योजक अनिल बंडेवार, ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. परशुराम करंजकर, न्यूरोसर्जन डॉ.अमित पडवळ, संशोधक शेतकरी नवनाथ कसपटे, शि.शि.प्र. मंडळाचे खजिनदार जयकुमार शितोळे, उद्योजक मधुसूदन चांडक, व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्य उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ, जिल्हा उपाध्यक्ष गणेश भोळे उपस्थित होते. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार भ.के. गव्हाणे, अशोक मठपती, एन. आर. कुलकर्णी, धनाजी शिंदे, अरुण बळप, प्रभुलींग स्वामी, संतोष सुर्यवंशी यांना सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. शहर अध्यक्ष हर्षद लोहार यांनी प्रास्ताविक केले. गणेश शिंदे यांनी सूत्रसंचलन केले. तर तालुका अध्यक्ष संदिप मठपती यांनी आभार मानले.

प्रसिध्द कोठारी लॅबोरेटरीच्या सौजन्याने सर्व सदस्यांची सीबीसी, लीपीड प्रोफाईल, बीएसएल (एफ), रक्तदाब, तपासणी करण्यात आली. याप्रसंगी संघटनेच्या वतीने धन्वंतरी पूजन करुन डॉ.आदित्य कोठारी यांना पुष्पगुच्छ देवून सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष विजय शिंगाडे, सचिव जमीर कुरेशी, कार्याध्यक्ष मयूर थोरात, खजिनदार ओंकार हिंगमिरे, उपाध्यक्ष राहुल गुरव, सचिव आस्लम काझी, कार्याध्यक्ष राहुल भालशंकर, खजिनदार मुजम्मिल कौठाळकर, व सदस्य शाम थोरात, समाधान चव्हाण, प्रदिप माळी, मल्लिकार्जुन धारुरकर, निलेश झिंगाडे, प्रविण पावले, सागर गरड, शुभम गोवर्धन, शोएब बागवान, नितीन गाढवे, किशोर सोनवणे, ओंकार गायकवाड, असिफ मुलाणी आदींनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button