अहिल्यानगरमहसूलमहाराष्ट्र

अवैध गौण खनिज उत्खननावर संगमनेर महसूल विभागाची धडक कारवाई ; जप्त वाळूचा वापर सत्कारणी !

B1न्यूज मराठी नेटवर्क

​संगमनेर महसूल विभागाने अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कायद्याचा बडगा उगारला असून धडक कारवाई सत्र सुरू केले आहे.

​१. महाळुंगी नदीपात्र: अवैध उत्खनन करणाऱ्या १० इसमांवर चोरी आणि पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनास्थळावरून १ ऑटोरिक्षा जप्त करण्यात आली आहे.

२. प्रवरा नदीपात्र (मौजे रायते): नदीपात्रात अवैध उत्खनन करणारे एक पोकलेन (Poclain) मशीन जप्त करून पोलीस कॉलनी येथे जमा करण्यात आले आहे. संबंधित वाहन मालक तन्वीर शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

कारवाई दरम्यान जप्त केलेला अवैध वाळू साठा चंदनापुरी येथील ‘घरकुल’ योजनेतील गरजू लाभार्थ्यांना वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे अवैध व्यवसायाला आळा बसण्यासोबतच शासकीय योजनांना गती मिळत आहे. तहसीलदार, संगमनेर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button