कृषीबार्शीमहाराष्ट्रसत्कार

कृषी क्षेत्रातील योगदानाला मानाचा मुजरा : कृषीनिष्ठ परिवारातर्फे मा आमदार राजाभाऊ राऊत यांचा भव्य सत्कार

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत शेतकरी वर्गासाठी सातत्याने योगदान देणाऱ्या माजी आमदार राजाभाऊ राऊत यांचा कृषीनिष्ठ परिवारातर्फे हृद्य व सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

शेती क्षेत्रातील प्रगतशील विचार, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, तसेच शेतकरी हितासाठी केलेल्या भरीव कार्याची दखल घेऊन हा सन्मान प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तसेच प्रमुख उपस्थितीत प्रवीण गाढवे सर, नितीन (बापू) कापसे, राहुल काकडे सर, संकेत कांदे सर, सोनू पवार, सतीश राऊत सर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून राजाभाऊ राऊत यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, त्यांनी शेतीकडे केवळ व्यवसाय म्हणून नव्हे तर समाजउन्नतीचे प्रभावी माध्यम म्हणून पाहिले आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन, नवे प्रयोग स्वीकारण्याची प्रेरणा, तसेच शेतीतील अडचणींवर उपाय सुचवण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे.

राजाभाऊ राऊत हे नेहमीच शेतकरी हितासाठी आघाडीवर राहिले असून, त्यांच्या कार्यामुळे अनेक शेतकऱ्यांना नवी दिशा व आत्मविश्वास मिळाला आहे. त्यांच्या या अथक परिश्रमांना सलाम म्हणूनच हा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे कृषीनिष्ठ परिवाराच्या वतीने सांगण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी कृषीनिष्ठ परिवाराच्या या उपक्रमामुळे स्थानिक स्तरावर शेतीविषयक कार्यकर्ते व शेतकरी बांधवांमध्ये नवी ऊर्जा व उत्साह निर्माण झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अशा प्रेरणादायी सन्मान कार्यक्रमांचे आयोजन सातत्याने होत राहावे, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.50000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button