निवडबार्शीमहाराष्ट्र

बार्शीच्या यश भारत शहा यांची फेडरेशन ऑफ हुमड जैन समाजाच्या महाराष्ट्र-गोवा युवा प्रकोष्ट राज्य कार्यकारिणीत मंत्रीपदी निवड

B1न्यूज मराठी नेटवर्क500

बार्शी, दि. २० : बार्शी येथील यश भारत शहा यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या फेडरेशन ऑफ हुमड जैन समाजच्या महाराष्ट्र-गोवा युवा प्रकोष्ट राज्य कार्यकारिणीत मंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र-गोवा युवा प्रकोष्टचे राज्याध्यक्ष संदेश गांधी यांनी या निवडीची घोषणा केली.
जैन समाजासाठी आजपर्यंत केलेले योगदान, विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांतील सक्रिय सहभाग आणि समाजहितासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन शहा यांची या महत्त्वाच्या पदावर निवड करण्यात आली आहे.
500लवकरच महाराष्ट्रासह इतर राज्यांतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा शपथविधी सोहळा इंदोर येथे पार पडणार आहे. ग्रामीण भागातून आंतरराष्ट्रीय स्तरावरील संघटनेत काम करण्याची संधी मिळाल्याचा आनंद व्यक्त करत, या जबाबदारीचे सोने करून समाजाच्या हितासाठी अधिक जोमाने कार्य करणार असल्याची भावना यश शहा यांनी व्यक्त केली.500या निवडीबद्दल भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटीचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष तथा श्री सन्मती सेवा दलाचे संस्थापक मिहीर गांधी यांच्यासह सोलापूर, अकलूज, इंदापूर येथील विविध जैन संघटनांचे पदाधिकारी, तसेच बार्शी पंचक्रोशीतील नागरिकांनी यश भारत शहा यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button