पुरस्कारबार्शी

पत्रकार धिरज शेळके यांना जिल्हास्तरीय दर्पणरत्न जोशाबा पुरस्कार जाहीर

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : सोलापूर जिल्ह्यामधील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा जोशाबा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने जिल्हास्तरीय जोशाबा पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. याचाच एक भाग म्हणून हिंदवी समाचार चे संपादक पत्रकार धिरज शेळके यांना पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल जिल्हास्तरीय ‘दर्पणरत्न जोशाबा पुरस्कार 2024’ ने सन्मानित करण्यात येणार आहे. यावर्षी जोशाबा पुरस्कार प्राप्त व्यक्तिमध्ये सोलापूर जिल्ह्यातील एकूण ३३ व्यक्तींचा समावेश आहे. रविवार दिनांक १८ फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता विठ्ठलराव शिंदे सभागृह, पंचायत समिती, कुर्डूवाडी येथे पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र दास यांचे अध्यक्षतेखाली तर प्रमुख उपस्थिती म्हणून युवकांचे आयकॉन माढा वेलफेअर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष धनराज शिंदे, संत कुर्मदास कारखान्याचे संचालक दादासाहेब साठे, माढा नगरपंचायतच्या नगराध्यक्षा मीनल साठे, दलित स्वयंसेवक संघाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप देवकुळे, गटविकास अधिकारी महेश सुळे, महावितरणचे अभियंता युवराज मोरे, चिंचोलीचे सरपंच संतोष लोंढे, तरंगफळचे माऊली कांबळे, हनुमंत गिड्डे आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार असून, सदर पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित रहाण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब देवकुळे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button