उद्घाटनमहाराष्ट्रसोलापूर

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते मंगळवेढा नगरपालिका शाळा क्रमांक 5 च्या नूतन इमारतीचे उद्घाटन

नगरपालिकेच्या शाळामधून जबाबदार व संस्कारक्षम नागरिक घडतील – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

B1न्यूज मराठी नेटवर्क500

नगरपालिकेच्या शाळा बनतील गुणवत्तेचे कोठार

सोलापूर दि. 21 : नगरपालिकेच्या शाळांमधूनच उद्याचे जबाबदार, संस्कारक्षम आणि गुणवंत नागरिक घडतील, अशी देखणी आणि सुंदर इमारत आज या ठिकाणी बांधण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या शाळेचा कायापालट करणारे आमदार समाधान अवताडे हेच या शाळेचे विद्यार्थी आहेत, ही कौतुकाची गोष्ट आहे. ज्या नगरपालिकेच्या शाळेत त्यांनी शिक्षण घेतले आणि ज्या शिक्षकांनी त्यांना घडवले, त्या सर्व शिक्षकांचा आज या समारंभात सन्मान करण्यात आला. हे विद्यार्थ्यांसाठी भविष्यात काहीतरी करून दाखवण्याची प्रेरणा देणारे आहे, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केले.

मंगळवेढा येथील नगरपालिकेच्या शाळा क्रमांक 5 च्या नूतन इमारतीचे उद्घाटन विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते आज पार पडले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ. करुणा शिवशरण, पंचायत समिती सभापती दीपाली ताड, नगराध्यक्षा सुनंदा अवताडे, उपनगराध्यक्ष येताळ भगत, सार्वजनिक बांधकाम सभापती गौरीशंकर गुरुकुल, तहसीलदार मदन जाधव, मुख्याधिकारी सुरेश भदर, नगर अभियंता प्रशांत सोनटक्के आदी मान्यवरांसह अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना विधानसभा अध्यक्ष नार्वेकर म्हणाले, “नगरपालिकेच्या शाळांचा कायापालट झाल्यास गोरगरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना आपले भवितव्य घडवण्यासाठी हक्काची शाळा मिळेल. शाळेतील शिक्षकांनी उत्तम संस्कार, दर्जेदार शिक्षण देऊन शाळेची गुणवत्ता वाढवल्यास अशा शाळांसाठी सरकार सर्वतोपरी मदत करेल.” वृक्षारोपण आणि कोनशिला अनावरण कार्यक्रमाच्या सुरुवातीला नार्वेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून नूतन इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.500“नगरपालिकेच्या शाळा बनतील गुणवत्तेचे कोठार” – आमदार अवताडे

याप्रसंगी आमदार समाधान अवताडे म्हणाले, “या संतभूमीचे आणि देवभूमीचे प्रतिनिधित्व करण्याचे भाग्य मला मिळाले. त्यामुळेच गोरगरीबांच्या मुलांसाठी नगरपालिकेच्या शाळांमध्ये सुधारणा घडवून आणण्याची संधी मला मिळाली. जसे मंगळवेढा हे ज्वारीचे कोठार आहे, त्याचप्रमाणे आता नगरपालिकेच्या शाळा या गुणवत्तेचे कोठार बनवण्याचा आमचा मानस आहे. पालक आणि शिक्षकांनी आपल्या मुलांना नगरपालिकेच्या शाळेत पाठवून शाळेचा पट वाढवावा. तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना उत्तम ज्ञान, गुणवत्ता आणि संस्कार द्यावेत.

शाळेसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा पुरवण्याचे काम आम्ही करू.” 2 कोटींचा खर्च कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात शिक्षण व क्रीडा सभापती सोमनाथ अवताडे यांनी या इमारतीसाठी 2 कोटी रुपये बांधकाम खर्च आणि 50 लाख रुपये सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आरोग्य सभापती प्रवीण खवतोडे यांनी केले.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button