धाराशिवमहाराष्ट्र

घटस्थापनेने श्री तुळजाभवानी देवींच्या शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ

B1न्यूज मराठी नेटवर्क500

तुळजापूर दि.११ ऑक्टोबर (माध्यम कक्ष) महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास आज रविवार,आश्विन शुक्ल प्रतिपदेला घटस्थापना करून प्रारंभ झाला.आज पहाटे श्री तुळजाभवानी मंदिरात पारंपरिक पद्धतीने श्री तुळजाभवानी देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली.

दुपारी जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते घटस्थापना विधी पार पडला.यावेळी आमदार तथा विश्वस्त राणाजगजितसिंह पाटील,जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील,नगराध्यक्ष तथा विश्वस्त विनोद गंगणे,निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर,उपविभागीय अधिकारी तथा विश्वस्त ओंकार देशमुख, तहसीलदार तथा विश्वस्त अरविंद बोळंगे, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने,उपनगराध्यक्ष रामचंद्र रोचकारी, महंत तुकोजी बुवा,महंत चिलोजी बुवा, महंत वाकोजी बुवा,महंत हमरोजी बुवा, सहायक व्यवस्थापक (सामान्य) जयसिंग पाटील,सहायक व्यवस्थापक (प्रशासन) नागेश शितोळे,सहायक व्यवस्थापक (धार्मिक) अमोल भोसले,अनुप ढमाले, रामेश्वर वाले,पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम,विपिन शिंदे,अनंत कोंडो यांच्यासह पुजारी बांधव व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.500घटस्थापनेचे महत्व
घट बसविण्याची जागा ही सिंहाच्या गाभाऱ्यात देवींच्या डाव्या बाजूला असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी श्री तुळजाभवानी देवीला अर्पण केलेल्या जमिनीतील माती घटस्थापनेकरिता आणली जाते.त्या मातीला ‘वावरी’ असेही म्हणतात.प्रथेप्रमाणे धाकटे तुळजापुरातील कुंभार कुटुंबीयांकडून कलश येतो.या कलशामध्ये गोमुख व कल्लोळ तीर्थाचे पाणी भरलेले असते.जिल्हाधिकारी व पुजाऱ्यांच्या उपस्थितीत गोमुख तीर्थाजवळ गंगा आवाहन केले जाते. त्यानंतर वाजत गाजत घट कलश सिंहाच्या गाभाऱ्यात आणून प्रतिष्ठापित केला जातो.

तसेच तुळजापुरातील शेटे कुटुंबीयांकडून सप्तधान्य (जवस, करडई,मूग,ज्वारी,गहू, मका व सातू) दिले जाते.घटाची स्थापना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते केली जाते. देवींची पहिली माळ जी नागवेलीच्या पानांची असते,ती माळ घटा वर अर्पण केली जाते.घटस्थापनेनंतर मंदिर संस्थानच्या वतीने ब्राह्मणास पाठ,हवन व अनुष्ठानासाठी वर्णी दिली जाते.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button