बार्शीसामाजिक

यशोदा पार्क येथे पाण्याच्या टाकीचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : येथील कासारवाडी लगत असलेल्या यशोदा पार्क येथे देणगी स्वरुपातून देण्यात आलेल्या २००० लिटर पाण्याच्या टाकीच्या लोकार्पण सोहळा देणगीदार, प्रमुख पाहुणे व यशोदा पार्कमधील तमाम अबालवृद्धांच्य उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.
यशोदा पार्क येथील ओपनस्पेस मध्ये नागरिकांच्या आरोग्यासाठी सुमारे १०० फुलझाडांचे रोपन करण्यात आले होते या रोपांची योग्य व सुस्थितीत वाढ होण्यासाठी पाण्याच्या साठवणुकीसाठी टाकीची आवश्यकता होती याचा विचार होवून त्याच पार्कमधील रहिवासी डॉ. हनुमंत तिकटे साहेब व समरहिल फाऊंडेशन या सामाजिक संस्थेचे संस्थापक प्रा.शंकर अंकुश यांच्या संयुक्त विद्यमाने २००० लिटरची पाणी टाकी देणगीस्वरुपात मंडळास देण्यात आली त्या टाकीचे लोकार्पण देणगीदार यांच्या हस्ते व बार्शी नगरपालिकेचे उपाध्यक्ष कृष्णराज (नाना) बारबोले, वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष उमेशजी काळे, जाणीव फाऊंडेशनचे अध्यक्ष तुळशीदास मस्के, प्रा.राजेंद्र माने, मेजर चांदणे, मेजर बागवान, यशोदा पार्क मित्रमंडळाचे अध्यक्ष विनोद गायकवाड, सचिव धनंजय काळे, खजिनदार गणेश वाघमारे, केंद्रप्रमुख बाळासाहेब अंकुशे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी मंडळाचे मार्गदर्शक लक्ष्मण लवळे, अर्जुन कडगंची, बिभिषण कवडे, दिपक परबत, विरेश कडगंची, बसवराज कत्ती, विजय कांबळे,मा.दादा ताटे,मा.श्रीकांत ढेरे, प्रमोद देशमुख, मच्छिंद्र पवार, कदम सर, सुहास लवळे, रणजित सोळगे,ज्योतिर्लिंग डेकोरेटर्सचे सचिन लवळे यांचेसह परिसरातील रहिवासी, महिलाबघिनी व उत्साही बालचमू उपस्थित होते. कार्यक्रमाचे दिमाखदार सुत्रसंचालन मा.किरण लांडे यांनी तर आभारप्रदर्शन गणेश वाघमारे यांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button