प्रशासनबार्शीमहाराष्ट्र

बार्शी तालुक्यात लवकरच ‘एसआयआर’ फॉर्मचे वाटप; मतदारांनी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत, तहसीलदार एफ. आर. शेख यांचे आवाहन

मतदार माहिती अद्ययावत करण्यासाठी विशेष मोहीम

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादीतील माहिती अद्ययावत करण्यासाठी बार्शी तालुक्यात लवकरच एसआयआर (Special Intensive Revision – SIR) मोहिमेअंतर्गत फॉर्मचे वाटप करण्यात येणार आहे. या मोहिमेद्वारे मतदारांची वैयक्तिक माहिती अद्ययावत करण्यात येणार असल्याने सर्व मतदारांनी आवश्यक कागदपत्रे पूर्वतयारीत ठेवावीत, असे आवाहन बार्शीचे तहसीलदार एफ. आर. शेख यांनी केले आहे.50000तहसील प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, एसआयआर फॉर्म भरताना मतदारांना काही आवश्यक कागदपत्रांची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळेपूर्वीच ही कागदपत्रे तयार ठेवून फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुलभ करावी.

फॉर्म भरण्यासाठी आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, रंगीत पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, स्वतःचा मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी आवश्यक राहणार आहे. तसेच फॉर्मवर छायाचित्र लावण्यात येणार असल्याने नागरिकांनी रंगीत पासपोर्ट आकाराचे फोटो काढून तयार ठेवावेत, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.5000दरम्यान, ही माहिती तालुक्यातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचावी यासाठी नागरिकांनी आपल्या कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवारामध्ये जनजागृती करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • मतदार ओळखपत्र (Election Card)
  • रंगीत पासपोर्ट आकाराचे 2 फोटो
  • स्वतःचा मोबाईल क्रमांक
  • ई-मेल आयडी

मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या या विशेष मोहिमेस नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार एफ. आर. शेख यांनी केले आहे.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button