बार्शी

परमेश्वर बिले यांच्या वाढदिवसानिमित्त 48 लोकांचे रक्तदान व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

B1न्युज मराठी नेटवर्क / वैराग प्रतिनिधी : गौतम नागटिळक

वैराग : बार्शी तालुक्यातील रातंजन येथे ग्रामपंचायत सदस्य
परमेश्वर बिले यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी डॉ. सचिन चव्हाण अशोक नागटिळक , पोलिस पाटील रमाकांत जाधव, अजित कवठेकर, धनंजय जाधव, उर्मिला देशमुख, सरपंच रंजना तिसरबुडे , विजय पवार, धनाजी हजारे, विक्रांत चव्हाण , राजेंद्र हजारे, डी.पी. जाधव, सोनू पाटील, किसन हजारे, प्रा. शहाजी चव्हाण, भगवंत रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी गणेश जगदाळे, अमोल नवले, शबाना पठाण, आकांक्षा कदम उपस्थित होते. या शिबिरात ४८ दात्यांनी रक्तदान केले. त्यानंतर रातंजन गाव प्रदूषणमुक्त करण्यासाठी ७५१ रोपांचे वाटप ग्रामस्थांना करण्यात आले. तसेच गावात विविध ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण देखील झाले. सूत्रसंचालन प्रा. शहाजी चव्हाण यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button