महाराष्ट्रसोलापूर

खासदार प्रणिती शिंदे यांनी घेतले प्रवीणदादा निकाळजे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन; कुटुंबियांचे सांत्वन करत वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली

B1न्यूज मराठी नेटवर्क5009

सोलापूर : आंबेडकरी चळवळ आणि राजकीय क्षेत्रातील एक अभ्यासू, लढवय्या व जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणारे नेतृत्व आज काळाच्या पडद्याआड गेले. आंबेडकरी चळवळीतील बुलंद आवाज तथा काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रवीणदादा निकाळजे यांचे आज, दि. २३ मे २०२६ रोजी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच सामाजिक, राजकीय आणि आंबेडकरी चळवळीत शोककळा पसरली.

खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहरातील कुमठा नाका येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले व भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तसेच त्यांनी निकाळजे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.5009प्रवीणदादा निकाळजे यांची ओळख एक अभ्यासू, निर्भीड आणि संघर्षशील नेतृत्व म्हणून होती. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणितीताई शिंदे यांचे ते अत्यंत निष्ठावंत सहकारी मानले जात होते. समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे, वंचित आणि सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देणे, तसेच आंबेडकरी चळवळ अधिक मजबूत करण्यासाठी आयुष्यभर निःस्वार्थपणे कार्य करणे, हे त्यांच्या जीवनकार्याचे वैशिष्ट्य राहिले.

काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी कायम प्रयत्न केले. सत्य आणि न्यायासाठी निर्भीडपणे उभे राहण्याची परंपरा त्यांनी जपली. त्यांच्या जाण्याने आंबेडकरी चळवळीला, काँग्रेस पक्षाला आणि सामाजिक क्षेत्राला एक मोठा लढवय्या योद्धा गमवावा लागला आहे. त्यांचे कार्य, त्यांची जिद्द आणि समाजाप्रती असलेली निष्ठा भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहणार असून, त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे.5009या दुःखद प्रसंगी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे तसेच काँग्रेस परिवार निकाळजे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून या कठीण प्रसंगी आम्ही तुमच्या सोबत आहोत. अशा शब्दांत भावना व्यक्त करण्यात आल्या.

याप्रसंगी सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, माजी महापौर संजय हेमगड्डी, नगरसेवक नरसिंह आसादे, माजी नगरसेवक रियाज हुंडेकरी, बाबा मिस्त्री, मनोज यलगुलवार, नरसिंग कोळी, माजी नगरसेविका अनुराधा काटकर, हणमंतू सायबोलू, गणेश डोंगरे, तिरुपती परकीपंडला, भीमाशंकर टेकाळे, गणेश आप्पा नरोटे, संजय गायकवाड, श्रीधर काटकर, सुभाष वाघमारे, श्रीशैल रणधीरे, बंटी चदनशिवे, लखन गायकवाड, परशुराम सातारेवाले, विवेक कन्ना, संस्कार नरोटे, धीरज खंदारे, शिवशंकर अंजनाळकर, संदीप आठवले, कोमोरो सय्यद, दिनेश म्हेत्रे, नागेश म्याकल, भीमराव शिंदे, संतोष सोनवणे, मीरा घटकांबळे, सचिन सुरवसे, गणपत कटरे, अंबादास नडगिरी, साई शिंदे, गोपी खांडेकर यांच्यासह इतर मित्रपरिवार उपस्थित होता.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button