कृषीबार्शीमहाराष्ट्रयोजना

कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा – दत्तात्रेय गावसाने विभागीय कृषी सहसंचालक, पुणे

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : बार्शी तालुक्यात विभागीय कृषी सहसंचालक पुणे यांनी भेट दिली दिनांक 10 जुलै 2025 रोजी बार्शी तालुक्यात कृषी विभागाद्वारे राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांना भेट दिली यावेळी गोडसेवाडी येथे उडीद पीक शेती शाळेत उपस्थित शेतकऱ्यांना उडीद पीक व्यवस्थापनासह कृषी विभागाच्या विविध योजना बद्दल दत्तात्रय गावसाने यांनी माहिती दिली.5000यावेळी उपस्थित उपविभागीय कृषी अधिकारी कुर्डूवाडी संजय वाकडे यांनी उडीद कीड व रोग व्यवस्थापन बद्दल शेतकऱ्यांना माहिती दिली. यावेळी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत बांधावर आंबा लागवड केलेल्या भगवान रामभाऊ कदम यांच्या प्लॉटची तर सलग लागवड केलेल्या आंबा बागेची दादासाहेब गणपत गुंड कासारवाडी यांच्या प्लॉटची पाहणी करण्यात आली. अरणगाव येथील तूर प्लस सोयाबीन व सलग सोयाबीन प्रकल्पास भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले यावेळी टोकन पद्धतीने लागवड केलेली श्री संदीप काजळे यांच्या सोयाबीन प्लॉटची तर तूर प्लस सोयाबीन अंतर्गत भाऊसाहेब शिंदे यांच्या शेतातील प्रात्यक्षिक प्लॉटची पाहणी करण्यात आली.

त्यानंतर फपाळवाडी येथील प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत समाधान फापाळ यांच्या खारमुरे ,फुटाणे, चिक्की ,राजगिरा लाडू निर्मिती उद्योग प्रकल्पास भेट देऊन प्रकल्पाबद्दल पाहणी करून माहिती घेण्यात आली.

यावेळी प्रधानमंत्री अन्नप्रक्रिया उद्योग विभागाचे डी आर पी शरद पाटील यांनी शेतमाल प्रक्रिया उद्योगाबद्दल उपस्थिती त्यांना माहिती दिली . सदर प्रकल्पास पस्तीस टक्के अनुदान शासकीय योजनेतून देण्यात येते.

यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी संजय वाकडे तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले कृषी अधिकारी रवी भोसले सुधीर काशीद सयाजी गायकवाड प्रसेनजीत जानराव बंडू पाटील नूतन पुजारी दत्तात्रय घोळवे अनिता व्हनकळस, धुळाप्पा मासाळ इत्यादी उपस्थित होते.500000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button