दिनबार्शीमहाराष्ट्र

रातंजन जि. प. प्रा. शाळेत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा

B1न्यूज मराठी नेटवर्क

वही व लेखन साहित्याचे वाटप करून 79 वा
स्वातंत्र्य दिन सामाजिक उपक्रमाने साजरा

वैराग : रातंजन ता.बार्शी येथे भारतीय स्वातंत्र्याच्या 79 दिनानिमित्त जि .प. प्रा. शाळा रातंजन येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सत्यवान देशमुख हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून गावच्या प्रथम नागरिक सरपंच तिसरबुडवे ताई, जेष्ठ विधिज्ञ देशमुख साहेब, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष , मानवता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक नागटिळक महाराज, उर्मिला काकी देशमुख व समस्थ ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.5000सत्यवान देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपापली मनोगते व्यक्त केली. कवायत सादर केल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले गेले. तसेंच मंथन, ATS यासारख्या परीक्षेत यश मिळवलेल्या आरुष भालचांद्र हजारे, पृथ्वीराज आप्पासाहेब माने, आर्यन अतुल गावासाने, श्रेया राजकुमार जाधव इत्यादी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवन्यात आले.

मानवता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक नागटिळक महाराज , काकी देशमुख यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांना शाळेची तथा अभ्यासाची गोडी लागावी यासाठी दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील वही व लेखन साहित्याचे वाटप केले. विविध मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

उपस्थित मान्यवरांच्या मनोगतानंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटत करण्यात आला. ठोकळ गुरुजी यांनी सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करून मुख्याध्यापक कुरुंद गुरुजी व अध्यक्षीय परवानगीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

वैराग प्रतिनिधी – गौतम नागटिळक50000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button