पुणेमहाराष्ट्रयोजना

अनुसूचित जातीच्या नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर पुरवठा योजना

B1न्यूज मराठी नेटवर्क

पुणे दि. 3 : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याच्या उपसाधनांचा पुरवठा करण्यासाठी रुपये 3 लाख 50 हजार मर्यादेत अर्थसहाय्य करण्यात येते. ही योजना सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे.

या योजनेसाठी स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावे. बचत गटातील किमान 80 टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत. मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा रुपये 3 लाख 50 लाख हजार राहील. प्रत्यक्ष साधनांच्या किंमतीच्या 10 टक्के स्वहिस्सा भरल्यानंतर 90 टक्के (कमाल रुपये 3 लाख 15 हजार ) शासकीय अनुदान अनुज्ञेय राहिल. योजनेअंतर्गत 9 ते 18 अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करता येईल.

योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसहित विहित नमुन्यातील अर्ज सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन समोर, येरवडा पुणे (दूरध्वनी क्र. ०२०-२९७०६६११) येथे सादर करावेत, असे आवाहन प्रसिध्दी पत्रकान्वये सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.
5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button