कृषीबार्शीमहाराष्ट्र

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर फळबागा, फुलशेतीचेही पंचनामे करा : आ. दिलीप सोपल

B1न्यूज मराठी नेटवर्क500

बार्शी : बार्शी तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात यंदा पावसाअभावी शेती व्यवसाय गंभीर संकटात सापडला असून, खरीप पिकांसोबत फळबागा व फुलशेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे फळबागा व फुलशेतीच्या नुकसानीचे स्वतंत्र पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई व आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आमदार अ‍ॅड. दिलीप सोपल यांची निवेदनाद्वारे मागणी
बार्शी तालुक्यात गेल्या जवळपास तीन महिन्यांपासून पावसाने मोठी ओढ दिल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला आहे.

परिणामी विविध फळपिकांच्या बागांवर दुष्काळाचे गंभीर परिणाम जाणवत आहेत. फळबाग उभी करण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक वर्षे मेहनत, मोठा खर्च व भांडवली गुंतवणूक करावी लागते. सध्या पाण्याअभावी अनेक शेतकरी विहिरी, बोअरवेल तसेच उपलब्ध पाणीसाठ्याचा वापर करून फळबागा जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत.500त्याचप्रमाणे बार्शी तालुक्यात अनेक भागांत शेतकऱ्यांनी फुलशेती केली असून, फुलपिकांना नियमित पाण्याची आवश्यकता असते. पाणीटंचाईमुळे या पिकांनाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे खरीप पिकांच्या पंचनाम्यांसोबतच फळबागा व फुलशेतीच्या नुकसानीची नोंद घेण्याची मागणी सोपल यांनी केली आहे.

दुष्काळग्रस्त भागातील सर्व प्रकारच्या फळबागा व फुलशेतीचे स्वतंत्र पंचनामे करावेत, पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या निकषानुसार तातडीने नुकसानभरपाई द्यावी तसेच भविष्यात पाण्याअभावी फळबागा व फुलशेती नष्ट होऊ नयेत यासाठी विशेष उपाययोजना जाहीर कराव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. खरीप नुकसानीच्या पंचनाम्यांसोबत फळबागा व फुलशेतीच्या नुकसानीचेही पंचनामे करण्याचे निर्देश महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी विनंती आमदार दिलीप सोपल यांनी केली आहे.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button