बार्शीसामाजिक

महामानव बहुउद्देशिय सामाजिक संस्थेकडून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी तालुक्यातील गुळपोळी येथील महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गुळपोळी गांवचे उपसरपंच निरंजन (बाळासाहेब) चिकणे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य कृष्णा चिकणे तर प्रमुख उपस्थिती युवा उद्योजक धनाजी चिकणे पोलीस पाटील बाळकृष्ण पिसे अमोल नरखडे होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रथिमेला पुष्पहार उपसरपंच निरंजन चिकणे, कृष्णा चिकणे, धनाजी चिकणे , अमोल चिकणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांचे सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आले.
त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष भैरवनाथ चौधरी किरण खुरंगळे , गणेश लंगोटे , गुलाब शेख , सुमित माळी, अमित काळे, नागनाथ फोके , शिवाजी चिकणे, अमोल नरखडे, बाळकृष्ण पिसे , राहुल मचाले, विश्वनाथ बारवकर, किशोर बारवकर , राजेंद्र गोरे, संजय बनसोडे , इत्यादि मान्यवर संस्थेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे अध्यक्ष विविध मान्यवारांनी मनोगत व्यक्त केली. सूत्रसंचालन किरण खुरंगळे तर कार्यक्रमाची प्रस्तावना , आभारप्रदर्शन भैरवनाथ चौधरी यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button