ठाणेनिधीमहाराष्ट्र

मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरिता मंदाकिनी सैतवडेकर यांच्याकडून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील कक्षास 50 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द

B1न्यूज मराठी नेटवर्क

ठाणे : ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे दि.1 मे 2025 पासून मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष सुरू झाला. अधिकाधिक गरजू रुग्णांनी या कक्षाचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष आणि जिल्हा माहिती कार्यालयामार्फत काही दिवसांपूर्वी करण्यात आले होते.

वृत्तपत्रातील या बातमीने प्रेरित होवून श्रीमती मंदाकिनी सैतवडेकर यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरिता 50 हजार रुपयांचा धनादेश निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने यांच्याकडे नुकताच सुपूर्द केला.

यावेळी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या अध्यक्ष डॉ. प्रियांका यादव, सदस्य राजेश वारे व पूजा माऊसकर-वडेकर हे उपस्थित होते.

नागरिकांनी स्वेच्छेने मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षास सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन श्रीमती मंदाकिनी सैतवडेकर आणि निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने यांनी याप्रसंगी जनतेला केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button