जिल्हा स्तरीय महिला बचत गट उत्पादन वस्तूंचे भव्य प्रदर्शनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचे हस्ते उद्घाटन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : महिला आर्थिक विकास महामंडळ, सोलापूर अंतर्गत नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण उद्योम विकास प्रकल्प अंतर्गत माविम 50 वा वर्धापन दिन व जागतिक महिलां दिन निमित्त जिल्हा स्तरीय बचत गटाचे उत्पादनाचे भव्य प्रदर्शन व विक्री चे आयोजन दिनांक 8 मार्च ते 10 मार्च दरम्यान आयोजित करण्यात आलेल आहे. शहरातील नॉर्थकोट मैदान येथे हे प्रदर्शन भरले आहे.

यावेळी कार्यक्रमाचे उदघाटन मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.सोलापूर, कुलदीप जंगम यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी पोलीस अधीक्षक, (ग्रामीण) अतुल कुलकर्णी त्यांच्या धर्मपत्नी सौ. महीमा कुलकर्णी , , PSI भरोसा सेल, ग्रामीण पोलीस. सुरेखा शिंदे, जिल्हा विकास व्यवस्थापक, नाबार्ड सोलापूर नितीन शेळके, सहायक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता सोलापूर संगीता खंदारे, विभागीय व्यवसाय विकास सल्लागार माविम, पुणे विभाग. सिद्धिराम माशाळे, उद्योगवर्धिनी, सोलापूर चंद्रिका चव्हाण आदी उपस्थितीत होते.

या कार्यक्रमाच्या वेळी कुलदिप जंगम यांनी बचत गटाच्या उत्पादनासाठी जिल्हास्तरावर एक स्वतंत्र दालन निर्माण करून त्या ठिकाणावरून सर्व उत्पादनाची विक्री व मार्केटिंग होईल आणि लवकरच याची सुरवात होईल असे आश्वासन दिले. सौ. कुलकर्णी मॅडम यांनी त्याच्या भाषणात महिलांन बरोबर संवाद साधताना महिला पुरुषांपेक्षा कमी नाहीत. आणि त्याही कोणत्याही कामात पुढाकाराणे पुढे आल्यास त्या कामात उच्च शिखरावर पोहचतील अशी अशा व्यक्त केली.
अतुल कुलकर्णी बोलताना म्हणाले पोलीस प्रशासन सदैव महिलांसोबत आहे. महिलांना कोणत्याही अडचणी असल्यास त्यानी पोलिसांची निसंकोच संपर्क करावा असे आवाहन केले व सर्वांनी विषमुक्त शेती करून आपले आपल्या कुटुंबाचे आरोग्य सुधारावे असे प्रतिपादन केले.

सिद्धिराम माशाळे आपले मनोगत व्यक्त करताना माविम तर्फे चालवण्यात येणारे उपक्रम व नवतेजस्विनी प्रकल्प अंतर्गत उप-प्रकल्प अंमलबजावणी बाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जिल्हा समन्वयक अधिकारी सोमनाथ लांमगूंडे यांनी माविमची सोलापूर तालुक्यातील वाटचाल व प्रगती बाबत मनोगत व्यक्त केले. यावेळी मोहोळ तालुक्यातील बचत गट सदस्य, पदाधिकारी, cmrc स्टाफ,मोहोळ व माळशिरस तालुका कर्मचारी उपस्तित होते. कार्यक्रमचे सूत्रसंचालन प्रशांत गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन सहायक जिल्हा समन्वय अधिकारी सतीश भारत यांनी केले.5000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या