दिनबार्शीमहाराष्ट्र

कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयात “मराठी राजभाषा गौरव दिन” उत्साहात साजरा

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : येथील कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयात ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा पद्मभूषण वि.वा. उर्फ तात्यासाहेब शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त “मराठी राजभाषा गौरव दिन” उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण व पूजनाने झाली. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी कर्मवीर ग्रंथालयाचे उपाध्यक्ष मा. धैयशील देशमुख होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून वृक्षमित्र सुनिल फल्ले यांनी उपस्थिती दर्शवली.

मराठी भाषेचे महत्त्व व तिच्या जतनासाठी आवश्यक उपाययोजनांवर प्रमुख मान्यवरांनी आपल्या मनोगतात भर दिला. या वेळी ज्येष्ठ सभासद अनिल धाट, सुरेश शिंदे, प्रेम अग्रवाल, राहुल लोंढे यांच्यासह बालवाचक आर्यन पोकळे, मंथन घावटे, अक्षय पोकळे, शौनक अग्रवाल आणि अनेक वाचक व सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ग्रंथपाल विनोद गायकवाड यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button