छत्रपती संभाजीनगरजयंतीमहाराष्ट्र

शिवजयंतीनिमित्त ‘जय शिवाजी – जय भारत यात्रा’ उत्साहात; मान्यवरांचा सहभाग

B1न्यूज मराठी नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर, दि.१९ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त ‘जय शिवाजी- जय भारत’ या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. विविध मान्यवर, नागरिक, विद्यार्थी या यात्रेत उत्साहात सहभागी झाले. पारंपारिक वेशभूषा व साहसी खेळांच्या सादरीकरणाने या यात्रेने लक्ष वेधून घेतले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या क्रांतीचौक येथील पुतळ्याजवळ सकाळी साडेसात वाजता इतर मागास बहुजन कल्याण तथा दुग्धविकास व अपारंपारिक उर्जा मंत्री अतुल सावे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी संगिता राठोड, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते शिव प्रतिमेचे पूजन करुन यात्रेस सुरुवात करण्यात आली.

ढोल पथक, लेझीमच्या तालावर यात्रेची सुरुवात झाली. तलवारबाजी, सायकलींग, स्केटिंग, मल्लखांब, जिमनॅस्टिक, योगासन, पोवाडा, पाळणागीत इ. सादरीकरण यात्रेत करण्यात येत होते. त्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. क्रीडा ज्योतही मान्यवरांच्या हस्ते नेण्यातआली. पैठण गेट, गुलमंडी मार्गे या पदयात्रेचा समारोप औरंगपुरा येथील महात्मा फुले पुतळ्याजवळ करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button