कृषीबार्शीमहाराष्ट्र

दुष्काळाशी दोन हात करत गुळपोळीच्या शेतकरी पुत्राची जिद्द; दुबईला जाणार दोन एकरांतील ढोबळी मिरचीचा माल

B1 न्यूज मराठी नेटवर्क500

बार्शी : बार्शी तालुक्यातील गुळपोळी येथील तरुण शेतकरी तानाजी अनिल मचाले यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दोन एकरांमध्ये ढोबळी मिरची (डब्बू मिरची) लागवड करून जिद्दीचे उदाहरण घालून दिले आहे. यंदा बार्शी तालुक्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने अनेक शेतकरी संकटात सापडले असताना तानाजी मचाले यांनी चिकाटीने पीक उभे केले आहे.

गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातील पिके वाहून गेली आणि मोठे नुकसान झाले. यावर्षी मात्र पावसाने दडी मारल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा कठीण काळात तानाजी मचाले यांनी ढोबळी मिरचीच्या लागवडीवर आतापर्यंत सुमारे १ लाख २५ हजार रुपये खर्च केला आहे.

सुरुवातीच्या टप्प्यात त्यांच्या शेतातून सुमारे २ टन मालाचे उत्पादन मिळाले असून, पुढील टप्प्यात अंदाजे ४० टनांहून अधिक उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे. इतर खर्च सोडून सध्या मिरचीला १७ रुपये प्रति किलो दर मिळत असून, पुढील काळात बाजारभाव वाढेल आणि चांगला दर मिळेल, अशी आशा तानाजी मचाले यांनी व्यक्त केली.500विशेष म्हणजे, गुळपोळीतील या शेतकऱ्याच्या शेतातील संपूर्ण ढोबळी मिरचीचा माल दुबईसह परदेशी बाजारपेठेत निर्यात होणार आहे. सर्व खर्च वजा जाता या पिकातून सुमारे १४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

“निसर्गाने साथ दिली नसली तरी मेहनतीच्या जोरावर यश मिळवण्याचा निर्धार केला आहे. पुढील टप्प्यात मिरचीला अधिक चांगला भाव मिळेल, अशी आशा आहे.” — तानाजी अनिल मचाले, तरुण शेतकरी, गुळपोळी

ही जिद्द बार्शी तालुक्यातील शेतकरी तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत असून, प्रतिकूल परिस्थितीतही आधुनिक शेतीतून यश मिळू शकते, हे तानाजी मचाले यांनी दाखवून दिले आहे.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button