बार्शीमहाराष्ट्र

युवाशक्ती जागर यात्रेनिमित्त बार्शीत पदाधिकारी संवाद बैठक संपन्न होणार

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी : भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत “युवाशक्ती जागर यात्रा” अंतर्गत पदाधिकारी संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक दि. १७ मे २०२६, रविवारी सायंकाळी ६.३० वाजता लक्ष्मी सोपान कृषी उत्पन्न बाजार समिती, लातूर रोड, बार्शी येथे होणार आहे.50000

या बैठकीस भारतीय जनता पक्ष व युवा मोर्चाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच युवक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून संघटन मजबुती, आगामी कार्यक्रमांचे नियोजन आणि युवकांच्या सहभागावर चर्चा होणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.50000कार्यक्रमासाठी राज्य व जिल्हास्तरीय अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून युवा मोर्चाच्या माध्यमातून युवकांमध्ये जनजागृती व संघटन बळकटीकरणाचा संदेश दिला जाणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता युवा मोर्चा बार्शी शहर व तालुका यांच्या वतीने करण्यात आले असून युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button