क्रीडा विषयकदिनमहाराष्ट्रहिंगोली

जिल्हाध‍िकाऱ्यांच्या हस्ते खेळांडूचा गौरव, राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात

खेळाडूंनी हिंगोली जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

B1न्यूज मराठी नेटवर्क500

हिंगोली, दि. २९ : जिल्ह्यातील खेळाडूंनी उपलब्ध क्रीडा सुविधांचा प्रभावी वापर करावा. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंगोली जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी तथा जिल्हा क्रीडा परिषदेचे अध्यक्ष राहुल गुप्ता यांनी आज व्यक्त केली.

मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राष्ट्रीय क्रीडा दिन कार्यक्रमात त्यांच्या हस्ते विविध स्तरांवर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला. जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी गुप्ता यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. प्रारंभी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांसह उपस्थ‍ितांकडून अभिवादन करण्यात आले.

जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यपातळीवर प्राविण्य मिळवून हिंगोली जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारप्राप्त प्रा. बंकट यादव यांनी मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडा कारकिर्दीवर मार्गदर्शन केले.500कार्यक्रमास विभागीय वन अधिकारी डॉ. राजेंद्र नाळे, हॉकी असोसिएशन, हिंगोलीचे अध्यक्ष ओमप्रकाश लेले, सचिव केशव दुबे, हिंगोली जिल्हा फेन्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष कल्याण देशमुख, जितेंद्र भट्ट, प्रा. आनंद भट्ट, अंध क्रिकेट असोसिएशनचे विभागीय अध्यक्ष गजानन मगर, जिल्हा क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर, हिंगोली जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे सचिव रमेश गंगावणे, हिंगोली जिल्हा सायकलिंग असोसिएशनचे सचिव शिवाजी इंगोले, माजी सेनगाव तालुका क्रीडा संयोजक सोपान नाईक आदी उपस्थित होते.

कार्यक्रमास खेळाडू, विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, क्रीडाप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हिंगोली जिल्हा हॉकी असोसिएशन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील क्रीडा अधिकारी प्रविण कोंडेकर, गणेश बोडखे, क्रीडा मार्गदर्शक निळकंठ श्रावण, वसीम शेख व अर्जुन पवार यांनी पुढाकार घेतला.500

                                                

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button