राहुल सोलापूरकर ला मेंटल हाॅस्पिटल मध्ये भरती करा – ॲड. अरविंद तायडे

0

राहुल सोलापूरकर यांच्या बेताल वक्तव्याचा वंचित कडून निषेध !

B1न्यूज मराठी नेटवर्क

पुणे : वंचित बहुजन आघाडी पुणे शहराच्या वतीने मंगळवारी(११फेब्रु.) बहुजनाचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या जातीयवादी राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात त्याच्या निवासस्थानी आंदोलन करण्यात आले त्यावेळी पुणे शहराचे अध्यक्ष एडवोकेट अरविंद तायडे यांनी राहुल सोलापूरकर हा मनोरुग्ण असल्याने त्याला येरवड्यात भरती करण्यात यावे अशी प्रशासनाला मागणी केली.

तसेच हा राहुल सोलापूरकर सतत महापुरुषांच्या विरोधात गरळ ओकत असून याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला यावा, यासाठी आंदोलन करण्यात आले.

यावेळी महिला अध्यक्षा अनिताताई चव्हाण, पुणे शहर उपाध्यक्ष अजय भालशंकर, माथाडी अध्यक्ष विशाल कसबे, उपाध्यक्ष विकास भेगडे पाटील, युवा अध्यक्ष सागर आल्हाट, सम्यक विद्यार्थी अध्यक्ष चैतन्य इंगळे उपाध्यक्ष दीपक ओव्हाळ, नवनीत अहिरे, संघटक सतीश रणवरे, कोथरूड विधानसभा उपाध्यक्ष दत्ता शेंडगे, महिला उपाध्यक्ष वर्षा जाधव, हे पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

ज्योती शिंदे, प्रभाकर सरोदे, बाळासाहेब बनसोडे, माणिक लोंढे, जाॅर्ज मदनकर, राजु ढाले, पितांबर धिवार, संतोष जोगदंड, संजय ढोंबे, हनुमंत फडके, राकेश पवार, चंद्रकांत कांबळे, ओंकार कांबळे, धर्मराज लांडगे, जितेश सरोदे, मुक्तेश्वर माने, प्रजयोत गायकवाड,पंचशील चौरे, दिलीप क्षेत्रे, दिपक कदम, रवींद्र गायकवाड, महेश शिंगे, नितीन कांबळे, सचिन भडकवाड, विशाल वंजारे, अमोल भडकवाड, राजु ढाले, गोपाळ वाघमारे, विवेक लोंढे, उमेश साळवी, सुरेखा गायकवाड, सचिन कलाधर, राहुल दहिरे, राजेंद्र सोनवणे, विशाल सरोदे, सतिश साबळे,परशुराम बनसोडे, महेंद्र येरेलू, अरविंद कांबळे, विजय साळवी, बाळासाहेब कडाळे, राम चव्हाण,नारायण जाधव, दादा गांधले,किशोर म्हस्के व प्रभु पाटेकर आदी शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या