क्राईमबार्शीमहाराष्ट्र

बार्शी बस स्थानकात जेष्ठ महिला प्रवाशाच्या हातातील दोन तोळे सोन्याच्या पाटल्या लंपास, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

B1न्यूज मराठी नेटवर्क500000

बार्शी : शहरातील बस स्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने एका ज्येष्ठ महिलेच्या हातातील सोन्याच्या पाटल्या चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाणे येथे अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रतिभा सुखदेव जाधव (वय ६३, रा. आशीर्वाद पार्क, मोहम्मदवाडी, पुणे) या आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी बार्शीत आल्या होत्या. दि. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे ३.१० वाजता त्या बार्शी बस स्थानकातून आरसोली (ता. भूम, जि. धाराशिव) येथे जाण्यासाठी बार्शी-भूम-देवळाली मार्गे जाणाऱ्या बसमध्ये चढत होत्या.

बस टिळक चौक परिसरात आल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, त्यांच्या उजव्या हातातील अंदाजे २ तोळे वजनाची सोन्याची पाटली हातातून गायब झाली आहे. त्यांनी तत्काळ बस कंडक्टरला याबाबत माहिती दिली. बस थांबवून शोध घेण्यात आला, मात्र सोन्याची पाटली मिळून आली नाही. त्यानंतर खात्री झाली की, बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या हातातील सोन्याची पाटली चोरून नेली.50000

चोरीस गेलेल्या सोन्याच्या पाटलीची अंदाजे किंमत सुमारे २ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे बस स्थानक परिसरातील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.50000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button