बार्शीमहाराष्ट्र

रातंजन येथील आदर्श विद्यालयात आनंद बाजार मोठ्या उत्साहात संपन्न , 35 हजाराची उलाढाल

B1न्यूज मराठी नेटवर्क

वैराग : बार्शी तालुक्यातील रातंजन येथील आदर्श विद्यालयात आनंद बाजाराचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन रातंजनचे ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. गावातील नागरीक यावेळी उपस्थित होते. आनंद बाजारामध्ये विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, भाजीपाला, विक्रीचे विविध स्टॉल लावण्यात आले होते. नागरिकांनी घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

यातून विद्यार्थ्यांच्या व्यवहार कौशल्यास मोठ्या प्रमाणात चालना मिळाली. आनंद बाजारामध्ये 35240 रुपये उलाढाल झाली. गावातील नागरिकांनी आनंद बाजाराचा आनंद घेतला.

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा सौ. सुदामती देशमुख, उर्मिला देशमुख मॅडम, शिवाजी भोसले सर , भालशंकर सर , विकास बनसोडे, माळी सर , सचिन साठेसर , विजय दळवी सर,प्रविण नायकल सर, आत्तार मॅडम,विद्यार्थी व ग्रामस्थ आणि शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वैराग प्रतिनिधी : गौतम नागटिळक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button