दिनधाराशिवमहाराष्ट्र

जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांच्या हस्ते ध्वजारोहण

B1न्यूज मराठी नेटवर्क

धाराशिव दि.२६ : ७६ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज २६ जानेवारी रोजी सकाळी ८.१० वाजता जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत व राज्यगीत झाले.त्यानंतर जिल्हाधिकारी श्री.ओंबासे यांनी स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी कुष्ठरोग प्रतिज्ञा व घोषणापत्राचे वाचन करून उपस्थितांना राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची शपथ दिली.

यावेळी अपर जिल्हाधिकारी शिरीष यादव, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, उपजिल्हाधिकारी संतोष भोर, संतोष राऊत, उदयसिंह भोसले, जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे, जिल्हा नियोजन अधिकारी अर्जून झाडे, तहसीलदार अभिजीत जगताप यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील, धाराशिव तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button