बार्शीमहाराष्ट्र

मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी तील उपोषणास पाठिंबा म्हणून बार्शीत आनंद काशीद यांचे आमरण उपोषण

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : मराठा समाजाला ओबीसी मधला आरक्षण मिळावं याकरिता जरांगे पाटील यांच्या साथीला बार्शी मध्ये आनंद काशीद यांनी अर्ध नग्न अवस्थेत लोटांगण घेत आमरण उपोषणास सुरुवात केली. मराठा समाज मागील वर्षी नवी मुबंई येथे आला असता जरांगे पाटलांच्या माध्यमातून सगे सोयरे कायदा करू असं आश्वासन दिलं. गुलाल उधळला व पंधरा दिवसात कायदा करू आस आश्वासन दिलं पण वर्ष झालं तरी अदयाप पर्यंत कायद्यात रूपांतर केल नाही. ही समाजाची फसवणूक आहे.

समाजाने तुम्हाला विधानसभेला भरभरून मत दिली त्या जोरावर तुम्ही आज बहूमताने निवडून आलात. त्या मताची परत फेड करा व मराठ्यांला न्याय द्या. आमच्या सर्व मागण्या मान्य करा, असे आवाहन आनंद काशीद यांनी उपोषण सुरु करताना केले. यावेळी बालाजी डोईफोडे, विक्रम घायतिडक, शोएब सय्यद, रवींद्र मुठाळ, रिंकू कांदे, अभिजित मोरे, यांच्या सह मोठया संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button