परभणीमहाराष्ट्र

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आज परभणी दौऱ्यावर

B1न्यूज मराठी नेटवर्क

परभणी, दि.22 : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे उद्या गुरुवार, (दि. 23) रोजी परभणी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे उद्या सकाळी 11.45 वाजता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृहात होणाऱ्या 26 व्या दीक्षांत समारंभास अध्यक्ष म्हणून उपस्थित राहतील. राज्यपाल राधाकृष्णन यांचे गुरुवार (दि.23) रोजी सकाळी मुंबई येथून शासकीय विमानाने नांदेड येथे सकाळी 11 वाजता आगमन होईल. नांदेड येथून हेलिकॉप्टरने परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या अश्वमेध मैदान येथील हेलिपॅडवर सकाळी 11.30 वाजता त्यांचे आगमन होईल.

कृषि विद्यापीठाच्या सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृहात दुपारी 12 वाजता होणाऱ्या दीक्षांत समारंभाच्या मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी ते उपस्थित राहतील. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची दीक्षांत समारंभाच्या मुख्य कार्यक्रमानंतर दुपारी 1.15 वाजता वेळ राखीव असेल. त्यानंतर दुपारी अडीच वाजता अश्वमेथ मैदानावरील हेलिपॅड येथे आगमन व हेलिकॉप्टरने नांदेडकडे प्रयाण करतील. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे दुपारी 2.55 वाजता नांदेड विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर दुपारी 3 वाजता ते शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button