माढ्याच्या सह्याद्री परिवाराच्या जिजाऊ सावित्री च्या गौरी,१८ वर्षापासुन सुरु आहे पुस्तकरुपी आरास

B1न्युज मराठी नेटवर्क
माढा : माढ्यातील फक्त सह्याद्री परिवाराच्या वतीने माॅसाहेब जिजाऊ,क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या रुपात महालक्ष्मीची उभारणी केली असुन गेल्या १८ वर्षांपासुन हा परिवार पुस्तकरूपी आरास उभी करुन पुस्तके वाचण्याचा संदेश देत आले आहेत.
यंदाच्या वर्षी देखील या परिवाराने माॅसाहेब जिजाऊ ना सिंहासनावर तर सावित्रीबाई फुले यांना उभ्या स्वरुपात ठेवण्यात आल्या आहेत.सह्याद्री परिवाराच्या शारदा शिंदे,धनश्री शिंदे यांनी विद्युत रोषणाई,फुलाची यासह अन्य पारंपरिक गौरी सजावटीला पुर्ण पणे बगल देत. राष्ट्रमाता माॅसाहेब जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या रुपात गौरी उभ्या केल्या आहेत. हळदी कुंकवासाठी येणार्या महिलांना शिंदे या प्रबोधनाची पुस्तके भेट देत आहेत.विविध प्रबोधनात्मक पुस्तके व समाजातील विविध ज्वलंत समस्यांविषयी सकारात्मक संदेश देऊन गौरी सजावट करण्याचा उपक्रम मागील १८ वर्षापासून सुरु ठेवला आहे. शारदा शिंदे,धनश्री शिंदे,यांना आरास उभी करण्यासाठी दत्ताजी शिंदे,संदीप शिंदे,जयदीप शिंदे,स्वागत शिंदे,शिवतेज शिंदे,संदेश शिंदे यांनी सहकार्य केले.
मराठा सेवा संघाच्या विचाराने प्रेरित होऊन जिजाऊ सावित्रीचा विचार घरोघरी जावा. प्रबोधनात्मक पुस्तकाच्या माध्यमातुन वाचन चळवळीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानेच आरास मांडण्याचा उपक्रम सुरुच ठेवल्याचे शारदा शिंदे,दत्ताजी शिंदे यांनी बोलताना सांगीतले.