जिजाऊ पब्लिक स्कूल या ठिकाणी दहीहंडी उत्सव उत्साहात संपन्न

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : जिजाऊ पब्लिक स्कूल तुळजापूर रोड या ठिकाणी श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त दहीहंडी कार्यक्रम मुलांनी अतिशय उत्साह पूर्ण वातावरणामध्ये मनोरे रचून आणि गाण्याच्या तालावर पाण्यामध्ये चिंब भिजून राधा आणि श्रीकृष्णाच्या वेशभूषेमध्ये गाण्याच्या तालावर फेर धरून दहीहंडी उत्सव मोठ्या सहाच संपन्न झाला .यावेळी संस्थेच्या वतीने सजवलेली दहीहंडी पताका तोरणे आणि गाण्यासाठी पारंपारिक वाद्य अशा मोठ्या उत्साह पूर्ण कार्यक्रमाची तयारी संस्थेच्या वतीने करण्यात आली होती. संस्थेच्या सचिवा असा वैशाली पवार यांनी राधा आणि श्रीकृष्ण यांच्या बद्दल मुलांना विशेष माहिती सांगून त्यांच्या वेगवेगळ्या रूपांबद्दल कल्पना दिली आणि कृष्णाच्या जन्माचे वेगवेगळे किस्से मुलांना सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सोनाली मांजरे आणि आभार प्रदर्शन सौ अमृता झाडे यांनी केले. तर यावेळी विराट पवार, उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव पवार पालकांचे आणि शिक्षकांचे कौतुक करून पुढील उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या