बार्शी सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या बांधकामाचा मार्ग मोकळा

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : जिल्हा व सत्र न्यायालयाची बार्शी येथे सन २०१४ साली स्थापना झाली. सदर सत्र न्यायालयामध्ये बार्शी, करमाळा, माढा या तीन तालुक्यांचे कामकाज सध्या चालत आहे. सदर कामकाज करताना सध्या अस्तित्वात असलेली इमारत ही अपुरी पडत होती त्यामुळे वकिल संघ बार्शी व स्थानिक लोकप्रतिनिधी मा.आमदार राजेंद्र राऊत यांनी शासनाकडे नविन इमारतीचे बांधकामासाठी प्रत्यक्ष निधी उपलब्ध होण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा चालु केला.

सन २०१८ साली सध्याचे पालकमंत्री व तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आमदार राजेंद्र राऊत यांनी पत्र दिले व सदर पत्रावर पालकमंत्री श्री. पाटील यांनी इमारतीचे बांधकामासाठी तात्काळ निधी उपलब्ध करुन देण्यास संबंधितांना आदेश केले.

बार्शी येथे देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना भेटी दरम्यान बाशी वकिल संघातर्फे निवेदन देण्यात आले. सदर निवेदनावरही उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी निधीसंबंधी शिफारस केली. त्यानंतर, आमदार राजेंद्र राऊत व वकिल संघाच्या पाठपुराव्याने, न्यायालयीन इमारतीच्या निधी मंजुरीसाठी दि. १७/०८/२०२२ रोजीच्या महाराष्ट्र शासनाच्या उच्चस्तरीय सचिव दर्जाच्या अधिका-यांच्या बैठकीमध्ये (High Power) रक्कम रु. ७६.१७ कोटी रुपये इतक्या रक्कमेचा प्रस्ताव मंजुर करण्यात आला. सदर प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यानंतर सदर कामाच्या अनुषंगाने दि. २५/११/२०२३ रोजी प्रत्यक्ष कामकाज सुरु करणेसाठी कामाची निविदा दि. २५/११/२०२३ दैनिक वृत्तपत्रात प्रसिध्द झाली, त्यामुळे बार्शी नुतन न्यायालयीन इमारतीच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला.

बार्शी न्यायालयीन इमारतीसाठी सन १९९५ साली गाडेगांव रोड बार्शी याठिकाणी सुमारे ११ एकर जमिन संपादित करण्यात आली व प्रत्यक्ष बांधकामाचा प्रस्ताव सन २०१० पासुन प्रलंबित होता त्यास मा. आमदार श्री. राजेंद्र राऊत व बार्शी वकिल संघ यांनी सन २०१८ पासुन मंत्रालयीन स्तरावर सतत पाठपुरावा करुन प्रत्यक्ष निधी मंजुर करुन निविदा प्रसिध्द करुन न्यायालयीन इमारतीच्या बांधकामाचा प्रश्न मार्गी लावला आहे. यामुळे बार्शी, करमाळा, माढा या तीन तालुक्याच्या सर्व नागरिकांची व वकिल संघाची व न्यायालयीन कामकाजासाठीची मोठ्या प्रमाणात सोय झालेली आहे.

वरील सर्व मंजुरी व निधी उपलब्धता यास मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री तथा विधी व न्यायमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार साहेब, तत्कालिन सार्वजनिक बांधकाम मंत्री व सध्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील साहेब यांचे बार्शी तालुक्याच्या वतीने व बार्शी वकील संघाच्या वतीने अध्यक्ष एड.अविनाश जाधव यांनी आभार मानले.

यावेळी वकील संघाचे उपाध्यक्ष एड.शंकर ननवरे,सचिव एड.राजकुमार गुंड, खजिनदार एड.कैलास बडवे, लायब्ररी चेअरमन एड. अविनाश गायकवाड व इतर सर्व पदाधिकारी व सर्व वकील बांधव उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या