निवेदनबार्शी

सकल मराठा समाजकडून वैराग मध्ये साखळी उपोषण सुरू…

वैराग येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे साखळी उपोषणात सहभागी झालेले सकल मराठा समाजबांधव….

B1न्यूज मराठी नेटवर्क

वैराग : मराठा समाजाला सरसकट ओबीसीमध्ये कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्यावे या मागणीसाठी वैरागमध्ये छत्रपती शिवाजी चौकात शनिवारपासून साखळी उपोषणाला सुरवात झाली .
मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे त्यांचा जो निर्णय आहे तो आम्ही मान्य करु, असा इशारा यावेळी मराठा बांधवांनी दिला..

जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत वैराग येथे कोणताही राजकीय कार्यक्रम होणार नाही. याबाबतचे निवेदन वैराग पोलिस ठाण्यात देण्यात आले आहे.

यावेळी डॅा. कपील कोरके, माजी सभापती मकरंद निंबाळकर, किशोर देशमुख, अँड. रणजित गुंड, अँड. राजाभाऊ गुंड, आनंद कोरके,रोहन गडसिंग, सरंपच सुशील दळवे, महेंद्र निंबाळकर, मारूती पौळ, अमरराजे निंबाळकर, नंदुकुमार पांढरमिसे, राहुल पालकर, आनंदकुमार डुरे, राहुल दळवी युवराज पासलकर यांच्यासह मराठा बांधव उपोषणात सहभागी झाले होते.पोलीस निरीक्षक विनय बहिर यांनी उपोषणस्थळी भेट देऊन पोलिस कर्मचाऱ्यांना उपोषण स्थळाची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या.

सासुरे ,गौडगाव, उपळे, दहिटणे, मुंगशी , तडवळे, ढोराळे, इर्ले, सारोळे येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरंगे- पाटील यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणास पाठिंबा दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button