आंदोलनबार्शी

सोयाबीन पिकाचे पंचनामे करूनही अनुदान मिळेना

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : तालुक्यात सोयाबीन पिकावर यलो मोझॅक व खोडकुज या विषाणूजन्य व बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे सोयाबीन पिकाचे ७० ते ८० टक्के नुकसान झाले होते. राज्य शासनाने या नुकसानीची दखल घेऊन, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांच्या आदेशानुसार तालुक्यातील सोयाबीन पिकाचे पंचनामे करण्यात आले होते. संबंधित तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांनी पिकाचे पंचनामे करून दोन महिने झाले, तरी अजून पर्यंत तालुक्यातील शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही.
शेतकर्‍यांना सोयाबीन पिकाचे अनुदान १० दिवसाच्या आत, जमा झाले नाही तर, बार्शी तालुक्यातील शेतकरी तहसील कार्यालय बार्शी येथे १९ डिसेंबर २०२३ रोजी उपोषण करणार आहेत, असे निवेदन अप्पर तहसीलदार वृषाली केसकर यांना राहुल भड, अशोक माळी, अमोल भोसले, भास्कर काकडे, चंद्रकांत मुंबरे आदी शेतकऱ्यांनी दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button