महाराष्ट्रमुंबई

‘सायबर सेफ मुंबई’ पोस्टर स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार राज्यपाल रमेश बैस यांचे हस्ते संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क

मुंबई : पोलीस सायबर शाखा व इंडियन मर्चंट्स चेंबरच्या (आयएमसी) महिला शाखेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘सायबर सेफ मुंबई’ पोस्टर स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार राज्यपाल रमेश बैस यांचे हस्ते राजभवन येथे संपन्न झाला.

विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षा या विषयावर जनजागृती करण्यासाठी आयोजित या स्पर्धेत विविध शाळांमधील ३ लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेच्या आयोजनात ‘रिस्पॉन्सिबल नेटिझम’, ‘कोकुयो कॅम्लिन’, ‘रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४१’ व ‘किताब खाना’ यांचे देखील सहकार्य होते.

बक्षीस वितरण सोहळ्याला विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, आयएमसी महिला शाखेच्या अध्यक्ष रोमा सिंघानिया, आयएमसीचे अध्यक्ष अनंत सिंघानिया, आयएमसीच्या उपाध्यक्ष अमृता सोमैया, ‘आमची मुंबई, सुरक्षित मुंबई’ उपक्रमाच्या संयोजिका भारती गांधी, स्पर्धेतील सहभागी विद्यार्थी, शिक्षक तसेच पालक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button