बार्शीमहाराष्ट्रसामाजिक

वाढदिवसानिमित्त १०८ किलो तांदूळ व अन्नदान; सुरेश इरेगौडा यांच्या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

B1न्यूज मराठी नेटवर्क500

बार्शी, दि. २ ऑगस्ट : आमदार राजेंद्र राऊत यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत बेंगलोर अंय्यगार बेकरीचे मालक तथा उद्योजक सुरेश इरेगौडा यांनी वाढदिवसावरील अनावश्यक व व्यर्थ खर्च टाळून समाजोपयोगी कार्याला प्राधान्य दिले. त्यांनी श्री भगवंत अन्नछत्रालयास १०८ किलो तांदूळ भेट दिले तसेच इंडियन रेड क्रॉसच्या मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नदान करून आपला वाढदिवस साधेपणाने आणि सेवाभावी पद्धतीने साजरा केला.

यावेळी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष ॲड. रणवीर राजेंद्र राऊत, संतोष सूर्यवंशी, संजय बारबोले, संस्थेचे पदाधिकारी आणि पत्रकार उपस्थित होते.5000“समाजसेवा हीच खरी ओळख, माणुसकी हाच खरा ठेवा” या भावनेतून सुरेश इरेगौडा यांनी राबविलेला हा उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. यशस्वी उद्योजक म्हणून ओळख असतानाही सामाजिक बांधिलकी जपत गरजूंसाठी मदतीचा हात पुढे करणाऱ्या सुरेश इरेगौडा यांच्या संवेदनशीलतेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

वाढदिवसाचा खर्च गरजूंच्या सेवेसाठी वापरण्याचा संदेश देणारा हा उपक्रम समाजात सकारात्मक विचार रुजविणारा असून, उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या या कार्याचे विशेष अभिनंदन केले.

बेंगलोर अंय्यगार बेकरीचे मालक सुरेश इरेगौडा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉🙏500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button