बार्शीसामाजिक

नवीन मराठी शाळा, बार्शी येथे जागतिक महिला दिनानिमित्त माता पालकांच्या विविध स्पर्धा घेऊन महिला दिन साजरा

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : नवीन मराठी शाळा,बार्शी येथे जागतिक महिला दिनानिमित्त माता पालकांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या.या स्पर्धेत 200 मातापालकांनी सहभागी होऊन शाळेच्या आव्हानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.म्हणून शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक लक्ष्मण वाघमारे सरांनी सर्वांचे आभार मानले. जागतिक महिला दिनानिमित्त उपस्थित सर्व मातापालकांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या संगीत खुर्ची, लिंबू चमचा, प्रश्न मंजुषा स्पर्धेत सुमारे 200 माता पालकांनी सहभाग नोंदवला. सर्वप्रथम संगीत खुर्ची स्पर्धा 7 फेऱ्या घेऊन पार पडली,यामध्ये प्रत्येक फेरीतून विजेत्या 5 माता पालकांना (एकूण 35) पुढील लिंबू चमचा स्पर्धेत संधी दिली.लिंबू चमचा स्पर्धेच्या 3 फेऱ्या घेण्यात आल्या,लिंबु चमचा स्पर्धेतील प्रत्येक फेरीतील विजेत्या 3 माता पालकांना (एकूण 9)अंतिम टप्यातील प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी निवडण्यात आले.प्रश्नमंजुषा स्पर्धा 3 गटात प्रत्येकी 3 फेऱ्या घेऊन पूर्ण करण्यात आली.या स्पर्धेत माता पालकांची तीन टप्प्यावर कसोटी घेऊन निवड करण्यात आली.आज झालेल्या स्पर्धेचे बक्षीस वितरण मा.श्री.अनिल बनसोडे साहेब प्रशासनाधिकारी न.पा.शिक्षण मंडळ, बार्शी ,पर्यवेक्षक संजय पाटील साहेब,बा.ए.सोसायटी चे सचिव अनंत कवठाळे सर, शाळेचे माजी मुख्याध्यापक नारायण चोपडे सर,प्रभारी मुख्याध्यापक वाघमारे सर यांच्या हस्ते पार पडले.या उपक्रमासाठी शाळेतील सर्वच शिक्षकांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात अनिल बनसोडे साहेब यांनी सर्व महिलांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मोबाईल व टीव्ही च्या आहारी गेलेल्या विद्यार्थ्यांना खेळाकडे वळवावे.मुलांच्या शैक्षणिक प्रगती बरोबरच आरोग्य, शरीर, आहार या गोष्टी कडेही पालकांनी लक्ष द्यावे.आज शाळेने अतिशय सुंदर उपक्रम राबविला.या उपक्रमात सर्व मातांनी खेळात सहभाग नोंदवला त्यामुळे मुलांनाही खेळाची आवड निर्माण होण्यास नक्कीच मदत होईल. यापुढेही शाळेने असेच उपक्रम राबवावे असे सांगितले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.ज्ञानेश्वर खुने यांनी केले तर आभार श्री.उमेश नायकुडे यांनी मानले.

आजच्या स्पर्धेतील विजेत्या माता खालीलप्रमाणे

1 प्रथम.डॉ.गौरी गायकवाड

2) द्वितीय… आशा शिंदे

3) तृतीय… साधना चौधरी

4) उत्तेजनार्थ…रुपाली घाडगे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button