बार्शीतील व्यावसायिकास मारहाण व जबरी चोरीच्या गुन्ह्यातील १० आरोपी ८ तासात अटक , बार्शी शहर पोलिसांची कामगिरी

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : बार्शीतील व्यावसायिक राजेश मुकणे व त्यांच्या कुटुंबियांसह इतरांना मारहाण करून, घरात तोडफोड करून सुमारे ४ लाखांचे नुकसान व जबरी चोरी प्रकरणातील संशयितांना बार्शी शहर पोलिसांनी १२ पैकी १० आरोपींना ८ तासात अटक केली. दोन संशयित अद्याप मिळून आलेले नाहीत. बुधवारी रात्री बार्शी शहरातील कासारवाडी भागातील इंदिरानगर परिसरात रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली होती.सदरचा गुन्हा दाखल होताच आरोपीच्या शोधासाठी पोलीस उपअधीक्षक जालींदर नालकुल, पो नि अण्णासाहेब मांजरे यांचे मार्गदर्शखाली सपोनि सुधीर तोरडमल, सपोनि ज्ञानेश्वर उदार यांच्या दोन टिम तयार करण्यात आल्या. यातील संशयित शिवाजी शिंदे यास त्याच्या इंदिरानगर येथील घरून ताब्यात घेवून चौकशी केली. त्याच्याकडून इतर संशयित आरोपींची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आपल्या टीम रवाना केल्या. पोलिसांनी गोपनीय माहिती व कौशल्यपूर्ण तांत्रिक तपास करत ८ तासामध्येच शिवाजी शिंदे रा इंदिरानगर कासारवाडी रोड, बार्शी ), अभिजीत चव्हाण (२६), रमेश जाधव (३५), नितीन चव्हाण (३४), बाबासाहेब रामचंद्र चव्हाण (३४), संतोष चव्हाण (४२, सर्व रा जाधववाडी ता माढा ), उत्तम बनसोडे (२२), सुमित जामदार रा इंदापूर, दीपक जामदार (३९ रा सरडेवाडी ता इंदापूर), या १० आरोपींना जाधववाडी ता. माढा जि.सोलापुर व इंदापुर जि.पुणे येथुन ताब्यात घेवुन त्यांचेकडे पोलिसांनी विचारपुस केली असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली आहे. सदर संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर ४ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. गुन्ह्यातील आरोपी विठ्ठल शिंदे व त्याची पत्नी यांचा पोलीस शोध घेत आहेत.
पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधिक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकूल यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे, सपोनि एस.ए. तोरडमल, सपोनि डी.डी. उदार, सपोफो अजित वरपे, पोहेकॉ रेवणनाथ भोंग, पोहेकॉ चौगुले, पोना मनिष पवार, वैभव टॅगल, पो कॉ ज्ञानेश्वर घोंगडे, अविनाश पवार, अर्जुन गोसावी, सचिन देशमुख, अंकुश जाधव, लगदिवे, अविरात बरबडे, चालक पो रामेश्वर मस्के सायबर पोलीस ठाण्याचे रतन जाधवर यांनी ही कामगिरी केली.