ग्रामीण भागातील तरुण उद्योजकाची पुण्यात यशस्वी घोडदौड; आकाश चौधरी यांच्या ‘इंद्रायणी चहा’च्या नवीन शाखेचे १६ नोव्हेंबर रोजी उद्घाटन

B1न्यूज मराठी नेटवर्क
पुणे / पिंपरी-चिंचवड : ग्रामीण भागातून पुण्यात येऊन कष्ट, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर व्यवसाय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे बार्शी तालुक्यातील गुळपोळी येथील तरुण उद्योजक आकाश चौधरी यांनी आपल्या उद्योजकीय प्रवासात आणखी एक यशस्वी पाऊल टाकले आहे. त्यांच्या ‘इंद्रायणी चहा’ या अमृततुल्यच्या नवीन शाखेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा सोमवार, दिनांक १६ नोव्हेंबर २०२६ रोजी संपन्न होणार आहे.
आकाश चौधरी यांचा पुणे परिसरात ‘आकाश इंटरप्रायजेस’च्या माध्यमातून इलेक्ट्रिकल, पीओपी मटेरियल, हाऊस वायरिंग, सर्व प्रकारची पीओपी व इलेक्ट्रिकल कामे तसेच ड्रिलिंग क्षेत्रात व्यवसाय सुरू आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली असून, आता व्यवसायाचा विस्तार करत त्यांनी चहा व्यवसायातही पदार्पण केले आहे.
‘इंद्रायणी चहा’ या नवीन शाखेत अस्सल चवीचा स्पेशल चहा, हॉट कॉफी, विविध मिल्क प्रॉडक्ट्स तसेच चवदार अल्पोपहार ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे.
उद्घाटन सोहळ्याचे ठिकाण : केट वस्ती रोड, केट वस्ती, ताथवडे, पिंपरी-चिंचवड.
ग्रामीण भागातून पुण्यासारख्या मोठ्या शहरात येऊन स्वतःच्या मेहनतीवर व्यवसाय उभारण्याचे स्वप्न साकार करणाऱ्या आकाश चौधरी यांनी आपल्या कर्तृत्वातून ग्रामीण तरुणांसमोर उद्योजकतेचा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या नवीन व्यवसायाच्या शुभारंभाबद्दल गुळपोळीसह बार्शी तालुक्यातील नागरिक, मित्रपरिवार आणि नातेवाईकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहून ‘इंद्रायणी चहा’च्या अस्सल चवीचा आस्वाद घ्यावा, असे विनम्र निमंत्रण आकाश चौधरी व चौधरी कुटुंबीयांच्या वतीने देण्यात आले आहे. संपर्क : आकाश चौधरी – ९८६०७४६४३६




