महाराष्ट्रमुंबई

एसटीच्या कंत्राटी भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखा; उमेदवारांची फसवणूक झाल्यास कठोर कारवाई करा !

बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून पैसे उकळणाऱ्या खासगी संस्थांची चौकशी करण्याचे निर्देश – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

B1न्यूज मराठी नेटवर्क500

मुंबई, दि. १३ नोव्हेंबर २०२६ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) लवकरच सुमारे १३ हजार ९८० चालक व यांत्रिकी कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि नियमानुसार पार पडावी. बाह्य संस्थेमार्फत करण्यात येणारी उमेदवारांची निवड एसटी महामंडळाने निर्धारित केलेल्या पात्रता निकषांनुसारच व्हावी, याची संबंधित संस्थेने आणि एसटी प्रशासनाने दक्षता घ्यावी. या प्रक्रियेत कोणत्याही उमेदवाराची फसवणूक होणार नाही, याची संपूर्ण जबाबदारी एसटी प्रशासनाची असेल, असे स्पष्ट निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.500दरम्यान, एसटी महामंडळाच्या नावाचा गैरवापर करून काही खासगी संस्था गरजू व बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवत त्यांच्याकडून अवैधरित्या पैसे उकळत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त होत आहेत. अशा प्रकारांमुळे नोकरीच्या आशेने असलेल्या तरुणांची आर्थिक फसवणूक होत असून, त्याचा थेट परिणाम एसटी महामंडळाच्या प्रतिमेवर होत आहे. काही समाजकंटकांच्या गैरकृत्यांमुळे महामंडळाची जनमानसातील प्रतिमा मलीन होणे ही गंभीर बाब असल्याचे मंत्री सरनाईक यांनी नमूद केले.500या पार्श्वभूमीवर, एसटी महामंडळाच्या नावाखाली सुरू असलेल्या अशा बेकायदेशीर प्रकारांची सुरक्षा व दक्षता विभागामार्फत सखोल चौकशी करण्यात यावी. उमेदवारांची फसवणूक करणाऱ्या संस्था व संबंधित व्यक्तींची ओळख पटवून दोषींविरुद्ध तातडीने गुन्हे दाखल करावेत, असे निर्देशही मंत्री सरनाईक यांनी दिले आहेत.

भरती प्रक्रियेच्या नावाखाली बेरोजगार तरुणांची आर्थिक लूट करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. भरती प्रक्रियेत पारदर्शकता, विश्वासार्हता आणि उमेदवारांच्या हिताचे रक्षण यांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button