कृषीबार्शीमहाराष्ट्र
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या बार्शी तालुक्यात दुष्काळ पाहणी दौऱ्यावर

B1 न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : खरीप हंगाम २०२६ मध्ये पावसाने मोठा खंड दिल्यामुळे बार्शी तालुक्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस हे बुधवार, दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २.०० वाजता बार्शी तालुक्यात दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस हे कुसळंब–धानोरे रोडवरील शिवारात प्रत्यक्ष भेट देऊन दुष्काळामुळे बाधित झालेल्या पिकांची पाहणी करणार असून शेतकऱ्यांशी संवादही साधणार आहेत.
तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष माहिती घेण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला आहे.
या दौऱ्याच्या निमित्ताने तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार (विधानपरिषद) राजेंद्र विठ्ठल राऊत यांनी केले आहे.



