निवेदनबार्शी

नागरिकांवर लादण्यात आलेल्या जाचक करमुक्तीसाठी काँग्रेस आयचे आंदोलन सुरू

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : नगर परिषद हद्दीतील सर्वसामान्य बार्शीकर मालमत्ताधारकांच्या संकलित करावरील 24% व्याजदराने आकारलेल्या दंड आणि शास्तीची रक्कम तात्काळ माफ करावी. पाणीपुरवठा सेवाशुल्क म्हणून ज्या मालमत्ताधारकांकडे नळ कनेक्शन नाही अश्या नागरिकांचे पाणीपुरवठा सेवाशुल्क रद्द करावे.1 एप्रिल 2023 पासून नव्याने सुरु होत असलेला मलनिस्सारन कर रद्द करावा व पूर्ण भुयारी गटारीच्या कामाचे ऑडिट जिल्हाधिकारीच्या द्वारे करूनच हा कर लागू करावा. घनकचरा व्यवस्थापन कराच्या नावाखाली सुरु असलेली नागरिकांची लूट तात्काळ थांबवावी या मागण्यासाठी आंदोलन सुरु आहे.बार्शी शहर काँग्रेस आय अध्यक्ष डॉ. विजय साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष वसिम पठाण, उपाध्यक्ष माणिक पवार, युवक काँग्रेसचे निखिल मस्के, संतोष शेट्टी, शहर सरचिटणीस अजित कांबळे, सेवादल शहराध्यक्ष विष्णू अस्वदे, शहर उपाध्यक्ष महेश जगझाप, महिला आघाडी अध्यक्ष सोनाली जगझाप आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन सांळुके यानी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button